*प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी जीवन हजारे*

*प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी जीवन हजारे*

*कोंकण एक्सप्रेस*

*प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी जीवन हजारे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुका शाखेच्या अध्यक्षपदी जीवन हजारे यांची तर सचिवपदी नंदकिशोर पाडगावकर यांची निवड करण्यात आली.
प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात पार पडले. समितीच्या मालवण तालुका शाखेची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी विकास घाडीगावकर, कार्याध्यक्षपदी महादेव असरोंडकर, कोषाध्यक्षपदी राजेंद्रप्रसाद गाड, मंगेश कांबळी यांची निवड करण्यात आली. निवडीच्यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सचिव तुषार आरोसकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, दादा जांभवडेकर, नंदू राणे, चंद्रकांत अणावकर, सुरेखा कदम, निकिता ठाकूर, नीलम बांदेकर, रुपेश गरुड, ऋतुजा जंगले, सुनील चव्हाण, नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, नेहा तांबे, भाग्यश्री वाडकर यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली. ही कार्यकारिणी २०२५-२०२८ या कालवधीसाठी निवड आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!