*कोंकण एक्सप्रेस*
*मठ-सिद्धार्थनगर येथे ३ व ४ मे डॉ.आंबेडकर जयंती*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
मठ-सिद्धार्थनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती निमित्त ३ व ४ मे रजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि.३ रोजी सकाळी पूजन, पंचशील, ध्वजारोहण, भिमस्तुती, १० वा. मुलांसाठी विविध स्पर्धा, दुपारी २ वा. सिद्धार्थनगर ते ग्रामपंचायत कार्यालय ते पुन्हा सिद्धार्थनगर पर्यंत सामजिक ऐक्य व सद्भावना मिरवणूक, सायं. ७ वा. नॉट फॉर म्युझिक ग्रुप सिद्धार्थ व सांस्कृतिक कार्यक्रम, दि. ४ रोजी सायं. ७ वा. जाहीर सभा आयोजित केली आहे. यावेळी मुख्याध्यापक सुनिल जाधव, प्रा.राकेश वराडकर, मठ सरपंच रूपाली नाईक, उपसरपंच शिवानंद गावडे, ग्रा.पं.सदस्य सोनिया मठकर उपस्थित राहणार आहेत. सायं. ७.३० वा. १२ वर्षाखालील व १२ वर्षावरील दोन गटात जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. लहान गटातील प्रथम चार विजेत्यांना अनुक्रमे रोख रूपये २ हजार, दीड हजार, १ हजार व ५०० तसेच चषक आणि मोठ्या गटातील प्रथम चार विजेत्यांना रोख रूपये ३ हजार, २ हजार, १ हजार, ७०० तसेच चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी मंदार मठकर (९४०५१६८१७६) यांच्याकडे नावनोंदणी करावी.