*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रध्वज जाळून पेहलगाव कृत्याचा निषेध*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
पेहलगाव येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीयांचा बळी घेणा-या अतिरेक्यांना पोसणा-या आणि त्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
शिरोडा येथे झालेल्या या निषेधावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रथमेश परब, वेंगुर्ला तालुका काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर, रेडी जि.प.विभागीय अध्यक्ष अभिजीत राणे, शिरोडा काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, निलेश मयेकर, कौशिक परब, बाळा जाधव, पंकज मसूरकर, राम परब, ओम परब, श्रवण गावडे, विकास कावळे, शिवसेना शाखा प्रमुख राकेश परब, युवासेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ, शेखर झांटये, विराज राऊत आदी उपस्थित होते.