*दहिबांव तलाठी ऋतुजा चौघुले राज्याच्या गृहसहाय्यक कक्ष अधिकारीपदी नियुक्ती*

*दहिबांव तलाठी ऋतुजा चौघुले राज्याच्या गृहसहाय्यक कक्ष अधिकारीपदी नियुक्ती*

*कोंकण एक्सप्रेस*

*दहिबांव तलाठी ऋतुजा चौघुले राज्याच्या गृहसहाय्यक कक्ष अधिकारीपदी नियुक्ती*

*लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

महाराष्‍ट्र लोक सेवा आयोगाच्‍या परीक्षेव्‍दारे महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गृहसहायक कक्ष अधिकारीपदी दहिबाव ग्राममहसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल तहसीलदार आर.जे.पवार यांनी त्‍यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी शुभेच्छा प्रदान करताना मुहसूल नायब तहसीलदार श्रीकृष्‍ण ठाकूर,संजय गांधी योजना नायब तहसीलदार सुरेंद्र कांबळे,आयटी असिस्‍टंट बाजीराव व सर्व ग्राममहसूल अधिकारी,मंडळ अधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल सत्‍कार करताना पवार यांनी त्‍यांना महसूल व शासकिय कामकाजाबाबत कानमंत्र दिला. तसेच दहिबांव सारख्‍या मोठया गावातील तलाठी सजाचा अनूभव पुढील शासकिय प्रवासात नक्‍कीच उपयोगी ठरेल असेही सांगीतले. यावेळी ऋतुजा यांना सर्वच सहकारी ग्राममहसूल अधिकारी यांनी शुभेच्‍छा देत कौतूक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!