*कोंकण एक्सप्रेस*
*”त्या” रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास जेनिफर लोबो यांनी दिला आंदोलनाचा इशारा..*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
साटेली भेडशी, भोमवाडी कुडासे, ता. दोडामार्ग येथील तिलारी जोड कालव्याला कुडासे रस्त्यालगत संरक्षक कठडा बांधण्याबाबत व कालव्याचे रस्त्याचे काम करण्यासाठी ,
दि.१५/०१/२०२५ रोजी मा. ग्रा. सदस्य जेनिफ़र मार्शल लोबो, या उपोषणास बसल्या होत्या.
कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चराठे – सावंतवाडी
याच्या कडून पूढील प्रमाणे आश्वासन मिळाले होते,
दोडामार्ग येथील तिलारी जोड कालव्याला कुडासे रस्त्यालगत संरक्षक कठडा बांधण्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, सदर कामास महामंडळ स्तरावरुन मंजुरी मिळाल्यानंतर निवीदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यक्षेत्रावर काम पूर्ण करेपर्यंत मार्च अखेर कालावधी आवश्यक आहे. तरी सदरचे काम मार्च अखेर पुर्ण करण्यात येईल असे आपणास आश्वासित करण्यात येते.
पण अजूनही ३-४महीने उलटून गेली आहे, तरी अजूनही कालव्याचे रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. तसेच
मा. ग्रा. सदस्य जेनिफर लोबो यांनी काम पूर्ण न झाल्यास सावंतवाडी येते ऑफिस समोर उपोषण ला बसण्याचा ही इशारा दिला आहे.