टेंबवाडीत रंगणार कबड्डीचा थरा*

टेंबवाडीत रंगणार कबड्डीचा थरा*

*कोंकण एक्सप्रेस*

*टेंबवाडीत रंगणार कबड्डीचा थरा*

*अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने १ ते ३ मे कालावधीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने अभय राणे मित्रमंडळातर्फे १ ते ३ मे २०२५ या कालावधीत टेंबवाडी येथे राज्यस्तरीय पुरुष व जिल्हास्तरीत महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय पुरुष गटासाठी अनुक्रमे ५५,५५५ रु., ३०,०५५ रु., ६,५५५ रु, ६,५५५ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू ५,५५५ रु. व चषक, उत्कृष्ट चढाई ३,०५५ रु. व चषक, उत्कृष्ट पकड ३,०५५ रु. व चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीसे आहेत. जिल्हास्तरीय महिला स्पर्धेकरिता अनुक्रमे १०,५५५ रु., ६,५५५ रु., १,५५५ रु., १,५५५ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू १,०५५ रु. व चषक, उत्कृष्ट चढाई ७५५ रु., उत्कृष्ट ७५५ रु. अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीस आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला आकर्षक चषक दिले जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ललित राणे, आैदुंबर राणे, अमिता राणे, संदेश आईकर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. दरम्यान, मित्रमंडळाकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी सुरू असून प्रेक्षक कबड्डीचे सामने बसून पाहता यावे, यासाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!