*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला रामेश्वर वर्धापनदिन ३० एप्रिल रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराचा ३५९वा वर्धापनदिन बुधवार दि.३० एप्रिल रोजी (अक्षय्य तृतीया) विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, दुपारी नैवेद्य, सायं.७ वा.श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.