*स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्यपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची निवड*

*स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्यपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्यपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची निवड*

*देवगड : प्रशांत वाडेकर*

शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईं संचलित देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्लें कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांची स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग
आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा हा उपक्रम महाविद्यालयांत राबविला जातो. करियर कट्टा या उपक्रमांतर्गत स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या सदस्य पदी प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांची निवड झाली आहे. प्राध्यापिका अक्षता मोंडकर या देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाची कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या करियर कट्टा समन्वय म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्याच्या या झालेल्या निवडीबद्ल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, प्राचार्य समीर तारी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!