परप्रांतीय महिलेचा कणकवली बस स्थानकात धिंगाणा

परप्रांतीय महिलेचा कणकवली बस स्थानकात धिंगाणा

*कोकण Express*

*परप्रांतीय महिलेचा कणकवली बस स्थानकात धिंगाणा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली एसटी बस स्थानकात आज सायंकाळी एका परप्रांतीय महिलेने धिंगाणा घातला. यात तिने आपल्या पतीलाही लाथा बुक्क्यांनी मार दिला. पती तेथून पळून गेल्यानंतर तिने अन्य प्रवाशांना त्रास देणे सुरू केले. शेवटी एसटी स्थानकातून कणकवली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. कणकवली पोलिसांनी बस स्थानकात जात सदर महिलेला पोलीस ठाण्यात आणले.
कणकवली बस स्थानकात सायंकाळी ५.३० वाजल्यापासून एका हिंदी भाषिक महिलेने आपला नवरा आणि अन्य एका व्यक्ती सोबत भांडण सुरू केले. त्यानंतर दोन पुरुष व त्या महिलेत धक्काबुक्की झाली होती. तिचा लहान मुलगा त्या पुरुषांनी सोबत नेल्यामुळे तिने अक्षरशः रडत आरडाओरडा केला.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण संदीप कदम यांनी पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्याशी संपर्क साधत तिला पोलीस ठाण्यात न्या,असे कळवले.अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कणकवली पोलिस ठाण्यात त्या महिलेची चौकशी सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!