*कोंकण एक्सप्रेस*
*रेडी येथे पहलगाम कृत्याचा तीव्र निषेध*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
पहलगाम येथील धर्मांध कृत्याचा निषेध असो अशा घोषणा देत पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे २२ एप्रिल रोजी धर्मांध दहशतवाद्यांकडून केवळ धर्मांध विद्वेषापोटी घडवून आणलेल्या सैतानी कृत्याचा रेडी येथील हिदू धर्मियांकडून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या हिदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामपंचायत परिसरात करण्यात आलेल्या या निषेधावेळी हिदू धर्मिय उपस्थित होते.