*कोंकण एक्सप्रेस*
*वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेमाचे प्रतीक – तहसीलदार दीक्षांत देशपांडे*
*आध्यात्मिक आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर करीत आहेत *
*ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न *
*कणकवली ः प्रतिनिधी*
वारकरी हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होऊन विठुरायाची प्रतिकृती आपल्यासमोर उभी राहते. तशीच प्रचिती मला आज या कार्यक्रमाला आली. वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेम या दोन गोष्टींवर उभा आहे. त्यामुळे या संप्रदायामध्ये कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही. असे प्रतिपादन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी शिरवल येथे केले.
ते कणकवली तालुक्यातील शिरवल येथील श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.काशिनाथ फोकमारे महाराज, शेगांव , माजी पंचायत समिती सभापती सुरेश सावंत, श्री . विठ्ठल -रखुमाई मंदिर समिती शिरवलचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे सचिव गणपत घाडीगांवकर , प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर, शिरवल सरपंच सौ.गौरी वंजारे, उपसरपंच प्रविण तांबे, पोलिस पाटील सुशिल तांबे,सुनिल कुडतरकर,रमेश सावंत, नितेश उर्फ आबा सावंत,लवु राणे,शिरवल ग्रामपंचायत अधिकारी श्रृती येडके, कसवण ग्रामपंचायत अधिकारी राधिका आचरेकर , राजेश शिरवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले की,ह.भ.प.गवंडळकर महाराज संप्रदायाची वर्षानुवर्षे,पिढ्यान् पिढ्या सुरु असलेली वारीची विचारधारा जोपासण्याचे आध्यात्मिक काम करत आहेत. निरव्यसनी पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या हातुन होत आहे.गेली १० वर्षे अखंडपणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या वतीने हिंदु धर्माची विचारधारा प्रत्येक हिंदुंच्या मनामनात रुजविण्याचे काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी केले आहे.असे गौरवोद्गार तहसीलदार देशपांडे यांनी काढले.
यावेळी ह.भ.प.काशिनाथ फोकमारे महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले की ,महाराष्ट्राला साधू संतांची शिकवण फार मोठी आहे. ही शिकवण तरुण पिढीला देण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहेत. मानवी मनात जे अवगुण आहेत त्यावर टाळ व मृदुंगाच्या सहाय्याने वार करणारे असे हे वारकरी संप्रदाय आहे. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मानवी मनातील अवगुण घालविण्याचे काम वारकरी करतो.असे ते म्हणाले.
माजी पंचायत समिती सभापती सुरेश सावंत म्हणाले की,शिरवल गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.हि परंपरा पुढे नेण्याचे काम विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या वतीने सुरु ठेवली आहे.गेली १० वर्षे अखंडपणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून संतसेवेचा वारसा जोपासला आहे.सुसंस्कृत आणि अध्यात्मिक पिढी घडविण्याचे सामाजिक काम ते करीत आहेत.हरीपाठ,किर्तनाच्या माध्यमातून शिरवल गावात आध्यात्मिक काम सुरु केले.आज अनेक तरुण -तरुणी या संप्रदायात तल्लीन होऊन जातात.याचे सर्व श्रेय गवंडळकर महाराज यांना जाते.अध्यात्मिक विचार आणि चांगले प्रबोधन करुन गवंडळकर महाराज यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आध्यात्मिक चळवळ उभी केली आहे.त्यामुळेच सुसंस्कृत समाज आज या माध्यमातून आपल्याला दिसत आहे.असे गौरवोद्गार सावंत यांनी काढले.
यावेळी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, उपसरपंच प्रविण तांबे यांनी आपले विचार व्यक्त केले.तहसिलदार दीक्षांत देशपांडे, माजी सभापती सुरेश सावंत यांच्यासह उपस्थित वारकरी यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन केले.तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन श्री.विठ्ठल – रखुमाई मंदिर समिती शिरवल च्या वतीने हे
ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
.यावेळी ह.भ.प.काशिनाथ फोकमारे महाराज, शेगांव आणि माजी सभापती सुरेश सावंत यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन .विठ्ठल – रखुमाई मंदिर समिती शिरवल च्या वतीने ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी सत्कार केला.
यावेळी शिरवल गावातील ग्रामस्थ, वारकरी, भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार सुनील कुडतरकर यांनी मानले.