*सांब सदाशिव मंदिरात कार्यक्रम*

*सांब सदाशिव मंदिरात कार्यक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*सांब सदाशिव मंदिरात कार्यक्रम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी-  प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला-कॅम्प भटवाडी येथील श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव मंदिरात २८ व २९ एप्रिल या कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार दि. २८ रोजी शिवपिडी मुखवटा, पादुका व प्रभावळ बसविण्याचा कार्यक्रम, संप्रोक्षण विधी, दुपारी १.३० ते ३.३० पर्यंत महाप्रसाद, सायं. ६ वा. कुडाळ येथील श्री देव भैरव जोगेश्वरी मंडळाची फुगडी, रात्रौ ८.३० वा. माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा ‘शंभूचं लग्न‘ हा नाट्यप्रयोग, मंगळवार दि. २९ रोजी सकाळी श्रीसत्यअंबा पूजा, सायं.६ वा. भजन, रात्रौ ८.३० वा. ओंकार दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘कृष्ण मिरा भेट‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!