*कोंकण एक्सप्रेस*
‘प्रेरणा‘ करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
अणसूर पाल विकास मंडळ, मुंबई व अणसूर पाल हायस्कूल माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. १ मे रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत अणसूर पाल हायस्कूल येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, पालकवर्गासाठी विद्यार्थी – करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ‘प्रेरणा‘ करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे.
मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या हस्ते होणार आहे. या शिबीरात ‘माझी यशोगाथा-स्पर्धा परीक्षेतील यशाच्या सुसंधी‘ यावर पराग मातोंडकर, ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करियर‘वर मिलिद देसाई, ‘फार्मसी क्षेत्र-नोकरी व व्यवसायाच्या दुहेरी संधी‘वर प्रा.मयुरेश रेडकर, ‘सिधुदुर्गातील संसाधने-शाश्वत उद्योग व व्यवसायाचे नवे पर्याय‘ यावर प्रसाद गावडे तर ‘यशस्वी उद्योजकाची गरूडझेप‘ यावर अंकुश गावडे हे व्याख्यान देणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लीलाधर गावडे (९८६९५६२११७) किवा जगन्नाथ गावडे (७०३०४५५८२३) यावर संफ साधावा.