*कोंकण एक्सप्रेस*
*शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व कलाक्षेत्रातील करियर व संधी या कार्यक्रमाचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधि*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली व देवरुख कला महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व कलाक्षेत्रातील करियर व संधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर ,पर्यवेक्षक श्री ए.व्हि. वनवे सर ,देवरूख कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रणजीत मराठे सर , प्रा.विक्रम परांजपे सर ,कलाशिक्षक – प्रथमेश गांवकर सर, प्रशालेचे कलाशिक्षक श्री प्रसाद राणे सर व जवळपास 120 विद्यार्थी उपस्थित होते .
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांची दोन गटांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व दुपारी एक वाजता श्री प्राध्यापक श्री परांजपे सर यांनी व्यक्तिचित्रणाचे ड्राय पेस्टल मध्ये प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवन्यात आले तसेच कलाक्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी कोणकोणत्या संधी कशाप्रकारे आहेत या संदर्भात परांजपे सर व प्राचार्य रणजीत मराठे सर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली त्यानंतर दुपारी दोन वाजता चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला