*कोंकण एक्सप्रेस*
*कासार्डे तांबळवाडीतील ‘श्री आवळेश्वर’ मंदिरात ३ में रोजी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
श्री आवळेश्वर देवस्थान कासार्डे तांबळवाडी येथे प्रति वर्षाप्रमाणे शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी स.९ वा. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.९ वा.श्री सत्यनारायण महापूजा,स.११.३०वा.महाआरती व तिर्थप्रसाद, श्री आवळेश्वर नवतरुण मित्र मंडळ तांबळवाडी ढोल पथकाचे लयदार ढोलवादन कार्यक्रम,दु.१ ते ३ वा ‘महाप्रसाद’ सायं-३ ते ५ वा हळदी कुंकू,सायं.५ ते सायं.८ वा पर्यंत स्थानिक भजने, रात्रौ.९.३०.वा.नंतर श्री विठ्ठल रुखमाई दिंडी भजन मंडळ आचरा देऊळवाडी बुवा श्री.लवू घाडी यांचे तर व आई भगवती कला दिंडी भजन मंडळ तोरसोळे (देवगड) बुवा संजय परब यांचे सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी महाप्रसाद धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री आवळेश्वर ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ, कासार्डे-तांबळवाडी यांनी केले आहे.