*तळेरे येथे आज भेरा चित्रपट : संवाद परिवाराचे आयोजन*

*तळेरे येथे आज भेरा चित्रपट : संवाद परिवाराचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेरे येथे आज भेरा चित्रपट : संवाद परिवाराचे आयोजन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

तळेरे येथील संवाद परिवाराच्यावतीने तळकोकणाच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला ‘भेरा’ चित्रपट शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता मधु कट्टा येथे दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

संवाद परिवाराच्यावतीने दरमहिन्याला एक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी भेरा या पहिल्या मालवणी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री वैजप्रभा चित्र निर्मित हा चित्रपट प्रसाद खानोलकर यांच्या ‘साकव’ या कथेवर आधारित आहे. तर दिग्दर्शन श्रीकांत प्रभाकर यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा प्रसाद खानोलकर आणि श्रीकांत प्रभाकर यांनी लिहिली आहे. तर समीर भास्कर यांचे छायांकन आहे.
या चित्रपटात सिंधुदुर्गामधील दीपक जोईल, श्रद्धा खानोलकर, प्रमोद कोयंडे, आकांक्षा खोत, विवेक वाळके, गौरव राऊळ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हा चित्रपट चेन्नई, जर्मनी, कान्स, पुणे आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजला आहे.
फ्रान्समधील कान्स या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केटसाठी महाराष्ट्र शासनातर्फे ‘भेरा’ची निवड करण्यात आली होती. पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाले. तर मुंबईत झालेल्या आशियाई चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांना प्राप्त झाला आहे. देशविदेशातील मान्यवरांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढा नावलौकिक मिळवलेला ‘भेरा’ हा पहिलाच मालवणी चित्रपट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!