*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडीत महावितरणने ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजनाचा शुभारभ*
*वैभववाडी /प्रतिनिधी : संजय शेळके*
महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरु केली आहे. या योजनेतर्गत वैभववाडी उपविभागातून पाच लकी ग्राहकांना या बक्षीस योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना पुढेही सुरु राहणार असून ग्राहकांनी ऑनलाईन वीज बील भरणा करून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरण चे उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांनी केले आहे.
वीज ग्राहक आता स्मार्ट होतं आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक विविध मार्गाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने वीज भरणा करीत आहेत. ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीमूळे वीज भरणा करणे सहज सोप्पे झाले आहे. यामुळे वीज वितरणचे वीज बिल थकीतचे प्रमाणही घटत आहे.याचा वीज ग्राहकांसह साहजिकच वीज वितरणलाही त्याचा लाभ होतं आहे.
स्मार्ट युगात ग्राहकही स्मार्ट व्हावा. शिवाय ऑनलाईन वीज बिल भरणा करण्याकडे ग्राहकांचा कल वाढावा यासाठी महावितरण कडून लकी डिजीटल ग्राहक ही बक्षीस योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत वैभववाडी उपविभागातील पाच लकी ग्राहकांना 3 स्मार्ट फोन व 2 स्मार्ट वॉच मिळाले आहेत. एप्रिल , मे व जून असे तीन महिने ही बक्षिसे देण्यात येणार आहेत.
एप्रिल मधील लकी पाच ग्राहकांपैकी तळेरे येथील भाग्येश जगन्नाथ सावंत यांना स्मार्ट फोन चे वितरण करण्यात आले आहे. सावंत याना सदर बक्षीस वैभववाडी उपविभागातील सहायक लेखापाल श्री.संदिप डुकरे यांच्या हस्ते देण्यात आले.