*शिवसेना  वैभववाडी उपतालुकाप्रमुख पदी कुसूर गावचे संतोष पाटील यांची निवड*

*शिवसेना  वैभववाडी उपतालुकाप्रमुख पदी कुसूर गावचे संतोष पाटील यांची निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना  वैभववाडी उपतालुकाप्रमुख पदी कुसूर गावचे संतोष पाटील यांची निवड*

*तर कोकिसरे जिल्हापरिषद विभागप्रमुख पदी यशवंत गवाणकर यांची निवड जाहिर*

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका कार्यकारिणीची सभा नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत व शिवसेना उपनेते अरुणभाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी शिवसेनेच्या वरिष्ठ यांचे आदेशाने व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या मान्यतेने तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी वैभववाडी शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी कुसुर गावचे सुपुत्र संतोष पाटील तर कोकिसरे विभाग प्रमुख पदी यशवंत गवाणकर यांची नियुक्ती जाहीर केली.
यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत व उपनेते अरुणभाई दुधवडकर यांनी संतोष पाटील व यशवंत गवाणकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना विधानसभा समन्वयक राजू राठोड,युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर,माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकुडे, उपतालुकाप्रमुख बाबा मोरे,लोरे विभागप्रमुख सूर्यकांत परब, अल्पसंख्याक तालुका प्रमुख जावेद पाटणकर,वसंत खानविलकर, नगरसेवक मनोज सावंत, उपविभागप्रमुख स्वप्निल रावराणे, विलास पावसकर, श्रीधर फोंडके, शंकर कोकरे,सुरेश पांचाळ, गुलजार काझी,अनंत नांदलस्कर, सुनिल पवार,अनिल कदम,नितेश शेलार, रत्नकांत कदम, श्रीकांत डाफळे, समीर लांजेकर, चंद्रकांत आम्रस्कर, सचिन आयरे, मिलिंद पवार, संदेश निग्रे, बाबू सरवणकर,योगेश गुरव आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!