*कोंकण एक्सप्रेस*
*रेकोबा हायस्कूलचे विविध स्पर्धेत यश*
*मालवण (प्रतिनिधी)*
जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या गोरे एज्युकेशन फाऊंडेशन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित वायरी मालवण येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. वेद प्रवीण कुबल याने १०० पैकी ९१ गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले. त्याचा देशात ३७ वा व जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. तसेच या परीक्षेत इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. वेदिका परशुराम लुडबे हिने शंभर पैकी ६६ गुण मिळवून यश संपादन केले.
सिंधूरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत रेकोबा हायस्कुलच्या सहावी व सातवी या दोन्ही वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इयत्ता सातवी मधील वेदिका परशुराम लुडबे हिने २०० पैकी १३८ गुण मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. इयत्ता सहावी मधील प्राची प्रमोद शेलटकर हिला ११० गुण तर केदार मसूरकर याला १०८ गुण प्राप्त झाले. या दोन्ही परीक्षेत बसलेल्या सर्व मुलांनी प्रशालेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक श्री. कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. हिंदळेकर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.