*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण आधार प्रतिष्ठान किंजवडे’ ने शैक्षणिक बांधिलकी जोपासली*
*शिरगांव | संतोष साळसकर*
सामाजिक कामकाजांबरोबरच शैक्षणिक कार्यातही अग्रेसर राहणारे ‘कोकण आधार प्रतिष्ठान’ नेहमीच सामाजिक बांधिलकी बरोबरच शैक्षणिक बांधिलकी जोपासण्याचे मोलाचे कार्य करत असल्याचे निदर्शनास येते. आज दि. २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडीतील ग्रामीण भागातील गोरगरीब,होतकरू विद्यार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले. शैक्षणिक,सामाजिक जाणीव जागृतीचा संदेश देत सामाजिक उपक्रमाबरोबरच शैक्षणिक उपक्रम हाती घेतलेले आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये स्कूल बॅग,पेना,लेखन साहित्य,वहया वितरित करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी शाळेतील वीस विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम घेण्यात आला. संस्थापक अध्यक्ष स्वप्निल मेस्ञी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हा. आकाशाला गवसणी घाला. आई-वडिलांना कधीच विसरू नका. तसेच शाळेला व शाळेतील गुरुजींना विसरू नका. असा सल्ला दिला.
याप्रसंगी कोकण आधार प्रतिष्ठान दिवा ठाणे यांचे संस्थापक- श्री स्वप्निल मेस्त्री अध्यक्ष- वैभव जाधव सेक्रेटरी- प्रशांत अनुभवणे खजिनदार- वसंत ठोंबरे उपाध्यक्ष -विजय गुरव सल्लागार -उमेश घोगळे, प्रशांत अपकर, राजेश परब, नरेश गोमले, नितीन जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप परब,जेष्ठ मार्गदर्शक उदय तळवडेकर, महिला बचत गट अध्यक्ष उर्मिला तळवडेकर,किंजवडे प्रा.आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.संतोष पालवे,मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, सहशिक्षक महेश इंगोले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंदराव जाधव यांनी केले तर आभार महेश इंगोले यांनी मानले.