*कोंकण एक्सप्रेस*
*काश्मीर पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने वैभववाडी येथे जाहीर निषेध*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
काश्मीर पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने वैभववाडी येथे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षित वाढ करावी.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी हिंदूंच्या अमरनाथ यात्रेच्या वाटेवर असलेल्या पैलवान येथील बैसणार खोऱ्यात हिंदुस्थानातील गेलेल्या पर्यटकांवर अतिरेकी संघटने कडून अमानुष हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांना त्यांचे नाव व ओळख पटवून क्रूरतेने मारण्यात आले. हा भारत देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आला आहे. याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासर्फे तीव्र निषेध करीत आहोत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे एप्रिल मे महिन्यात जिल्ह्यात सर्व पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. परंतु काश्मीर येथील हल्ल्यामुळे पर्यटकांच्या मनामध्ये असुरक्षितता वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षतेची उपाय योजना करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री .नंदू शिंदे,तालुका प्रमुख श्री .मंगेश लोके, श्री. संदीप सरवणकर , श्री .मनोज सावंत, श्री . संतोष पाटील, जावेद पाटणकर, श्री. यशवंत गवाणकर, श्री . राजू रावराणे, श्री .स्वप्नील रावराणे,श्री.नितेश शेलार, श्री.राजाराम गडकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.