*कोंकण एक्सप्रेस*
*नमसवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास मंजूरी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
गेली अनेक वर्षे रखडलेल्या आणि पूर्णपणे जीर्ण झालेल्या उभादांडा-नमसवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणास सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूरी दिल्याने ग्रामस्थांमधून समाधानाचे वातावरण आहे.
उभादांडा गावातील नमसवाडी हा रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने येथून प्रवास करताना ग्रामस्थांना त्रास संभवत होता. हाच रस्ता परबवाडा आणि गवंडेवाडा या भागाला जोडत असल्याने तेथीलही ग्रामस्थ येथून ये-जा करतात. त्यामुळे हा रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. या रस्त्याचे डांबरीकरण प्राध्यान्याने होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड.अमेय कनयाळकर, यतिन खानोलकर आणि रजत साळगांवकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे २७ मार्च २०२५ रोजी निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी नमसवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास मंजूरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण काम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांना प्रवास करणे सोईचे होणार आहे.
फोटोओळी – नमसवाडी रस्त्याबाबत अॅड.अमेय कनयाळकर, यतिन खानोलकर आणि रजत साळगांवकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे निवदेनाद्वारे लक्ष वेधले.