*कोंकण एक्सप्रेस*
*सांगूळवाडीच्या सरपंचपदी स्नेहल भोवड बिनविरोध*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
सांगूळवाडी गावच्या सरपंचपदी स्नेहल संजयकुमार भोवड यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगुळवाडीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे. आधी ठरल्यानुसार पूजा रावराणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे स्नेहल भोवड यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.
स्नेहल भोवड यांची सरपंच पदी निवड होताच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अध्यासी अधिकारी विशाल चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळाजी शिवराम रावराणे, राहुल भास्कर जाधव, सत्यवान बाबू सुतार, पूजा जितेंद्र रावराणे, गौरी भालचंद्र रावराणे,वंदना विलास लाड, प्रकाश सीताराम पाटील यांच्या सोबत ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर मधुकर सावंत, ओमप्रकाश शंकर भोवड, एसटीचे माजी वाहतूक नियंत्रक संजयकुमार भोवड, संजय यशवंत विश्वासराव, विनायक दिगंबर गुरव ,रमेश रघुनाथ गुरव आदी उपस्थित होते.
फोटो
सांगूळवाडीच्या नूतन सरपंच स्नेहल भोवड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना माजी सरपंच प्रकाश पाटील. सोबत माजी सरपंच पूजा रावराणे, गौरी रावराणे,ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर सावंत, ओमप्रकाश भोवड,संजयकुमार भोवड,अध्यासी अधिकारी विशाल चौगुले, राहुल जाधव, सत्यवान सुतार आदी.