कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके सचिवपदी संजय सावंत, खजिनदारपदी रोशन तांबे यांची निवड ः कार्यकारिणी बिनविरोध

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके सचिवपदी संजय सावंत, खजिनदारपदी रोशन तांबे यांची निवड ः कार्यकारिणी बिनविरोध

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके
सचिवपदी संजय सावंत, खजिनदारपदी रोशन तांबे यांची निवड ः कार्यकारिणी बिनविरोध*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हाप्रतिनिधी भगवान लोके यांची तर सचिवपदी संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅड. संतोष सावंत व जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य महेंद्र मातोंडकर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहातील ही कार्यकारिणी निवडण्यात आली.
उपाध्यक्षपदी नंदू कोरगावकर, नितीन कदम, उमेश बुचडे, सचिन राणे, खजिनदारपदी रोशन तांबे, सहसचिवपदी दर्शन सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून उदय दुधवडकर, संजय बाणे, विनय सावंत, तुळशीदास कुडतरकर, उल्का तावडे, रंजिता तहसीलदार, तुषार हजारे यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लक्ष्मीकांत भावे यांची पालकसदस्य तर सल्लागार अशोक करंबेळकर, संतोष वायंगणकर यांची निवड करण्यात आली.
बैठकीला पत्रकार परिषद प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे, तालुकाध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर तांबट, रमेश जोगळे, दिलीप हिंदळेकर, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे, उपाध्यक्ष अनिकेत उचले, चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, राजन कदम, सुधीर राणे, भास्कर रासम, तुषार सावंत, राजेश सरकारे, मिलिंद पारकर, संजय राणे, पप्पू निमणकर, पंढरीनाथ गुरव, राजन चव्हाण, आनंद तांबे, रामाकांत बाणे, विशाल रेवडेकर, हेमंत वारंग, संयोग सावंत, गणेश पारकर, विनोद जाधव, शशिकांत सातवसे, किरण खाजवाडकर, विराज गोसावी, अस्मिता गिडाळे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान लोके व सचिव संजय सावंत व नूतन कार्यकारिणीचे अॅड. संतोष सावंत, महेंद्र मातोंडकर, अजित सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक करंबेळकर, संतोष वायंगणकर, संतोष राऊळ, अजित सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देत कार्यकारिणीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून टीम चांगले काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यकारिणीच्या निवडीनंतर कणकवली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान लोके व त्यांच्या टीमला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर जम्मू-कश्मिरमधील पहलग्राम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना तालुका पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक अजित सावंत यांनी केले. आभार माणिक सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!