निगुडे नविनदेऊळवाडी मोरीची जिल्हा परिषद उपअभियंता श्री. अंगद शेळके यांनी केली पाहणी

निगुडे नविनदेऊळवाडी मोरीची जिल्हा परिषद उपअभियंता श्री. अंगद शेळके यांनी केली पाहणी

*कोंकण एक्सप्रेस*

*निगुडे नविनदेऊळवाडी मोरीची जिल्हा परिषद उपअभियंता श्री. अंगद शेळके यांनी केली पाहणी*

*बांदा ः प्रतिनिधी*

निगुडे नवीन देऊळवाडी येथील मोरी गेले अनेक वर्ष झाले. बांधून परंतु सदर काम खूप जुने असून त्या ठिकाणी पाईप व मोरीला दरवर्षी भगदाड पडायचे यासंदर्भात माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपअभियंता यांना पाहणी करण्यासाठी सांगितले होते. त्याचीच दखल घेऊन आज सदर मोरी बाबत पाहणी केली असता . ती बांधण्याकरता व त्या ठिकाणी संरक्षक भिंत सहा मीटर घ्यावयाची आहे‌. अशा सूचना उपअभियंत्यांनी शाखा अभियंता यांना दिले आहेत. सदर मोरी ही दरवर्षी ग्रामस्थ, मेहनत करून डागडुजी करायचे तत्कालीन शाखा अभियंता श्री. शिंदे यांनी सदर मोरीसाठी प्रस्ताव सादर केला होता सन २०२१ परंतु निधी कमी असल्यामुळे ते काम थांबले होते. आता सदरचे काम हे रस्ते विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर असून त्या ठिकाणी पक्कीमोरी व साईडला संरक्षक भिंत असणार असून सदरचे काम मंजूर असून येत्या आठ दिवसात काम सुरू करण्याचे सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत असे उपअभियंता श्री. शेळके यांनी सांगितले. त्याचप्रमाणे निगुडे गावठणवाडी उर्वरित रस्त्यावर संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी निगुडे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, उपअभियंता अंगद शेळके, शाखा अभियंता श्री. टेमकर, माजी उपसरपंच गुरदास गवंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!