*कोंकण एक्सप्रेस*
*नावळे तामटीचाकणा येतील लाईटचे लोखंडी पोल तात्काळ बदलावेत*
*अशी मागणी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीकडून होत आहे*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
नावळे तामटीचाकणा येथी लाईटचे लोखंडी पोल पूर्ण गंजून सडले असून ते कधीही जमिनीवर पडून अपघात होऊ शकतो याकडे ग्रामस्थासह ग्राम पंचायतीने वेळोवेळी पोल बदलण्याची महावितरण कंपनीकडे मागणी करून सुद्धा महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
नावळे गावासह तामटीचिकणा वाडी येथील वीज वितरण कंपनीच्या मालकीचे लोखंडी पोलची लाईन सन1972 ची असून हे लोखंडी पोल पूर्ण गंजून सडले आहेत यामुळे ते कधीही जमिनीवर कोसळून अपघात होऊ शकतो तर काही पोल घराशेजारी असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हे लोखंडी पोल तात्काळ बदलण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीकडे वेळोवेळी केली असता सुद्धा महावितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ही लाईन तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी करत असता महावितरण कंपनीचे अधिकारी आपल्याकडे लोखंडी पोल नसल्याचे कारण देऊन वेळ काढून घेत आहेत सदरील पोलमुळे या वाडीसह गावातील पोल पडून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असं ग्रामस्थांमधून प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी या मागणीची तात्काळ दखल घेऊन महावितरण कंपनीने हे पोल तात्काळ बदलावेत अशी मागणी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीकडून होत आहे.