*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची २५ एप्रिल रोजी सभा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीची विस्तारित कार्यकारिणी सभा शुक्रवार २५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता जि.प.पू. प्राथ. शाळा कणकवली नं. ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. शाखाध्यक्ष सुशांत मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी, ३१ मार्च २०२५ पर्यंतचा जमा-खर्च सादर करणे व मंजुरी घेणे, नूतन तालुका कार्यकारिणीमधील उर्वरित पदांवर निवड करणे, कोकण विभागीय मेळावा खर्च रक्कम जिल्हा शाखेस देणेबाबत विचार विनिमय आणि सभासद नोंदणी आढावा या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.
सचिव निलेश लक्ष्मण ठाकूर यांनी सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, सर्व महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य आणि सर्व सभासदांना या महत्त्वपूर्ण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.