वारक-यांना मंत्री उदय सामंत यांनी दिलेला टेम्पो झाला गायब

वारक-यांना मंत्री उदय सामंत यांनी दिलेला टेम्पो झाला गायब

*कोंकण एक्सप्रेस*

*वारक-यांना मंत्री उदय सामंत यांनी दिलेला टेम्पो झाला गायब*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी भेट घेवून देणार निवेदन ; परशुराम उपरकर यांची माहिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांसाठी दिलेला छोटा हत्ती टेम्पो वारकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही, असे शिंदे सेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिंदेसेने अंतर्गत वादातून हा टेम्पो गायब करण्यात आल्याचे चर्चेत आहे. त्यामुळे वारकऱ्यांना न्यायासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी वारकरी त्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. उपरकर म्हणतात, वारकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार शासन आपल्पासाठी कार्यक्रमात त्यांना टेम्पो देण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार हा टेम्पो वारकऱ्यांसाठी प्रदान करण्यात आल्याचे शिंदे सेना पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत जाहीर केले. टेम्पो प्रधान करण्यात आल्याचे फोटोही जाहीर झाले होते. मात्र हा टेम्पो त्यांच्यापर्यंत न पोहोचता तो एका पदाधिकाऱ्याच्या भाच्याजवळ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वारकऱ्यांसाठी देण्यात आलेला टेम्पो अशा प्रकारे मधल्या मध्ये गायब होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? शिंदे सेना पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात हा टेम्पो अडकल्याची चर्चा आहे. वारकरी या टेम्पोचा शोध घेत असून हा टेम्पो वारकऱ्यांना देण्यासाठी ते उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे.

वास्तविक याबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दखल घेत वारकऱ्यांचा गायब झालेला टेम्पो त्यांना पुन्हा मिळवून देण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने अंतर्गत वादातून शिंदे सेना पदाधिकारी पत्रकार परिषदेत घेत हा विषय जाहीर केला. याचाच दुसरा अर्थ या वारकऱ्यांना न्याय कोण देणार असाच आहे. म्हणूनच 24 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी वारकरी यांची भेट घेणार असल्याचे श्री. उपरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!