*फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत थ्री फेज लाईन द्या-फोंडाघाट रहिवाश्यांची मागणी*

*फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत थ्री फेज लाईन द्या-फोंडाघाट रहिवाश्यांची मागणी*

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत थ्री फेज लाईन द्या-फोंडाघाट रहिवाश्यांची मागणी*

*महावितरण चे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना शिवसनेना महिला आघाडीच्या वतीने दिले निवेदन*

*मागणी लवकरात-लवकर पूर्ण न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा*

*कणकवली – प्रतिनिधि*

फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत मोठ्या प्रमाणात व्यपारी वसाहत व औद्योगिक निर्मिती असणारे प्रकल्प आहेत. तसेच येथे बाजापेठ असल्या करणारे लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. सदर ठिकाणी असलेला विजेचा पुरवठा हा कमी क्षमतेचा असल्याकारणाने वारंवार विजेच्या समस्या जाणवत आहेत.सदर मार्गावर थ्री फेज लाईन ओढण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी कडून अनेक वेळा महावितरण चे फोंडा कार्यालय येथे विनंती अर्ज दिलेले आहेत.परंतु अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आज महावितरण चे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना निवेदन दिले व त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर माळी यांनी लवकरात लवकर उपाय योजना केली जाईल असा शब्ध दिला. तसेच स्मार्ट मीटर व शेती पंपा बाबत शिवसेनेचे शिष्ट मंडळ उद्या जेई यांची भेट देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, विलास गुडेकर, महिला तालुकाअध्यक्ष माधवी दळवी, वैदेही गुडेकर, उपतालुकाध्यक्ष संजना कोलते, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री आदी फोंडा गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!