*कोकण Express*
*शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या तीन सदस्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप*
*काहीही झाले तरी शिवसेनेचा अध्यक्ष बसणार नसल्याचा दावा…*
*भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली*
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला काही अवधी शिल्लक असताना भाजप आणि शिवसेनेत वाक् युद्ध रंगले आहे. आज या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषद शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या तीन सदस्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. दरम्यान पैसे देण्याचा प्रकार झाला असला तरी उद्या कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार नाही. उलट त्या ठिकाणी शिवसेनेचे सदस्य भाजपात आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असाही टोला तेली यांनी लगावला.
श्री तेली यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, गटनेते रणजीत देसाई, मंदार कल्याणकर उपस्थित होते.यावेळी तेली म्हणाले,
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना सत्ता बदल करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यांचा तो केविलवाणा प्रयत्न ठरला आहे.
आमच्या तीन सदस्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. यातील देवगड तालुक्यातील किंजवडे मतदार संघाच्या सदस्या मानसी जाधव यांना दोन लाख रुपये घरी नेवून दिले होते. ते पैसे मानसी जाधव यानी परत केले.
आमचे ३१ ही जिल्हा परिषद सदस्य एकसंघ आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत चमत्कार होवून सेनेची सत्ता येवूच शकत नाही. उलट सेनेचे सदस्य भाजपात आल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण सेनेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. सचिन वाझेंचे पैसे घेवून सेना राजकारण करीत आहे. विकत घेवून सत्ता बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यानी याबाबत तपास करीत हा पैसा कुठून आला ? कोणी आणला ? कशासाठी आणला ? याचा शोध घ्यावा, अशी मागणी तेली यानी केली.