*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले कौतुक*
*कलमठ ग्रामपंचायतला दिली सरप्राईज भेट; शाळेतील विद्यार्थ्यां समवेत साधला संवाद*
*कणकवली दि. २२ एप्रिल*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रभागी असलेल्या कलमठ ग्रामपंचायतला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सरप्राईज भेट दिली. या भेटीत सरपंच संदीप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक बांधिलकीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्या उपक्रमाटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी विशेष कौतुक केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय उपक्रमाचे निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यालयांना सरप्राईज भेट देत आहेत. त्यानुसार संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील कलमठ गावाला श्री. खेबूडकर यांनी भेट दिली. गावातील विविध योजनांचा आढावा घेत असताना स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी स्त्रोत, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व इतर बाबींवर आढावा घेत चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना कलमठ ग्रामपंचायतला केल्या. कलमठ ग्रामपंचायतच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत उपक्रमांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.