*फोंडाघाट येथील जागृत देवस्थान श्री देव वाघोबा मंदिरात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम*

*फोंडाघाट येथील जागृत देवस्थान श्री देव वाघोबा मंदिरात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट येथील जागृत देवस्थान श्री देव वाघोबा मंदिरात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

फोंडाघाट येथील जागृत देवस्थान श्री देव वाघोबा मंदिरात शनिवारी (ता. 26) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव वाघोबा क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ फोंडाघाट (गांगोवाडी) यांच्यावतीने हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यानिमित्त शनिवारी सकाळी 8 वाजता श्री देव वाघोबा पूजन, त्यानंतर श्री गणेश पूजन, 9.30 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. पासून महाप्रसाद देण्यात येईल.

दुपारी 3 वाजता श्री देव वाघोबा क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ फोंडाघाट गांगोवाडी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, 3.30 वा. गुरुदास प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट गडगेसखल बुवा लकुळ गोसावी यांचे सुश्राव्य भजन, त्यानंतर औदुंबर प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट बोकलभाटले बुवा भरत मोरे यांचे सुश्राव्य भजन सादर होणार आहेत.

सायंकाळी 6 वा. हरिपाठ व महा आरती, रात्रौ 8 वाजता ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, बुजवडे राधानगरी यांचे संगीत भजन, रात्रौ 10.30 वाजता माडदेव प्रासादिक भजन मंडळ मोहूळ वरचीवाडी हरकुळ खुर्द बुवा लवू सावंत यांचे दिंडी भजन सादर होईल. त्यानंतर स्थानिक सुस्वर भजने होतील. या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!