*कोंकण एक्सप्रेस*
*भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी धोंडी चिंदरकर यांची फेर निवड…..!*
*शिरगाव | संतोष साळसकर*
मालवण तालुका भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्षपदी चिंदर गावचे सुपुत्र धोंडी चिंदरकर यांची सर्वानुमत्ते बिनविरोध फेर निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी चिंदरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा कोळंब येथील तालुका बैठकीत केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा महिला अध्यक्ष संध्या ताई तेरसे, माजी तालुका सभापती राजू परुळेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विलासजी हडकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय केंनवडेकर, संतोष गावकर, भालचंद्र राऊत, गणेश कुशे, सौरभ ताम्हणकर, विजय निकम, आबा फोंडेकर, विनोद लब्दे, दिगंबर जाधव, संजय लोके, राजन पांगे, बाळू वस्त, सुमित सावंत, महेश वरक, दीपक सुर्वे, आबा हडकर, अजित साटम, राजन गावंकर, निलेश खोत, संदीप सावंत, अमित घागरे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना निरीक्षक प्रमोद रावराणे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी भाजपा मंडल अध्यक्षांची निवड करण्यात येत आहे. भाजपा हा लोकशाही मानणारा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाच्या धोरणानुसार मालवण ग्रामीण मंडल अध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. नूतन मंडल अध्यक्ष चिंदरकर पक्ष संघटन मजुबूत करण्यासाठी तळागाळा पर्यंत काम करतील असे सांगत त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. सक्रिय सदस्य हा खरा भाजप कार्यकर्ता, प्रथम राष्ट्र, पक्ष आणि मी अशी भावना ठेवून पक्ष आदेश देईल असे काम करा तसेच बूथ अध्यक्ष हा पक्षाचा गाभा आहे असे मत ज्येष्ठ भाजप नेते विलास हडकर यांनी व्यक्त केली.
तसेच नूतन ग्रामीण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे भाजपा पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी चिंदरकर यांनी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच खासदार नारायण राणे यांचें विशेष आभार मानले. आपण प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचे आश्वासन चिंदरकर यांनी दिले.