यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ संघ विजेता

यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ संघ विजेता

*कोंकण एक्सप्रेस*

*यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ संघ विजेता*

*स्पर्श मुंबई-उपनगर संघ उपविजेता ः विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना भैरवनाथ पुणे संघ विरुद्ध स्पर्श मुबंई-उपनगर संघ यांच्यात झाला. यात भैरवनाथ संघाने स्पर्श मुंबई-उपनगरचा पराभव करीत यंगस्टार चषकावर नाव कोरले.
प. पू. भालचंद्र महाराज संस्थानच्या नजीक असलेल्या नगरपंचायतीच्या क्रीडासंकुल परिसरात यंगस्टार मित्रमंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भैरवनाथ पुणे संघाने स्पर्श मुंबई-उपनगर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्श मुंबई-उपनगरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सिद्धीविनायक मुंबई उपनगर संघाने पटकाविले. चतुर्थ पारितोषिक यंगस्टार मित्रमंडळाने पटकाविले. या स्पर्धेत १५ संघांनी सहभाग घेतला होता. शिस्तबद्ध संघ इच्छाशक्तीनगर, पालघर ठरला. अष्टपैलू खेळाडू हर्षद माने (भैरवनाथ पुणे) हा ठरला. उत्कृष्ट पकड विघ्नेश पवार (स्पर्श मुंबई-उपनगर) याने केली. उत्कृष्ट चढाई ओम कुदळे (सिद्धीविनायक मुंबई-उपनगर) याने केली. पंच म्हणून रत्नागिरी, मुंबईतील पंचांनी काम पाहिले. स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विजेत्या व उपविजेत्या ठरलेल्या संघांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारितोषिक देऊन गौरविले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, माजी जि.प.उपाध्यक्ष रंजन राणे, मोहन तळगावकर, अवधूत तळगावकर, संजय पेटकर, अरुण जोगळे, संतोष जोगळे, भैय्या आळवे, रुपेश परब, परेश परब, नंदू वाळके, रुपेश वाळके, अमिता राणे, प्रियांका कोरगावकर, ललित राणे आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रकाशझोतात रंगलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी कबड्डीप्रेमींनी गर्दी केली होती. मंडळाने कबड्डीप्रेमी बसता यावे याकरिता प्रेक्षक गॅलरी उभारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!