भालचंद्र महाराज संस्थानाला नगरपंचायत मालकीची जागा देण्याबाबत मुंबईत ​२३ रोजी बैठक

भालचंद्र महाराज संस्थानाला नगरपंचायत मालकीची जागा देण्याबाबत मुंबईत ​२३ रोजी बैठक

​*कोकण Express*

*भालचंद्र महाराज संस्थानाला नगरपंचायत मालकीची जागा देण्याबाबत मुंबईत ​२३ रोजी बैठक*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनाही बैठकीचे निमंत्रण*

​*कणकवली ः प्रतिनिधी*

​कणकवली नगरपंचायतची भालचंद्र महाराज संस्थान कडील जागा संस्थानाला हस्तांतरण करण्याबाबत मुंबई मध्ये ​२३ मार्च रोजी सायंकाळी ​५:​१५ वा. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, समिती सभागृह, नेपियन्सी रोड प्रियदर्शनी पार्क शेजारी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आमदार वैभव नाईक यांच्यासोबतच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व भालचंद्र महाराज संस्थांचे पदाधिकारी यांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कणकवली भालचंद्र महाराज संस्थाना जवळील प्राथमिक शाळेची जागा नगरपंचायतच्या मालकीची असून, सदर जागा भालचंद्र महाराज संस्थानाने आपल्याला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या जागेच्या बदल्यात तेथून काही अंतरावर नवीन जागा देण्यास संस्थानकडून अनुकूलता दर्शवण्यात आली होती. त्यामुळे भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस होणाऱ्या गर्दीचा विचारात करत, व यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेत आमदार वैभव नाईक यांनी याबाबत राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कणकवली मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह राज्यातील संबंधित महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी रश्मिकांत इंगोले यांनी या बैठकीस संदर्भात संबंधितांना आदेश दिले आहेत. त्यामुळे या बैठकीत आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!