हिंदुत्ववादी भाजपचा पदाधिकारी निघाला घंटाचोर

हिंदुत्ववादी भाजपचा पदाधिकारी निघाला घंटाचोर

*कोंकण एक्सप्रेस*

*हिंदुत्ववादी भाजपचा पदाधिकारी निघाला घंटाचोर*

*हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या आ. निलेश राणेंचा आणखी एक कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी विजय इंगळे याला मंदिरांतील घंटा चोरी प्रकरणात झाली अटक*

*विजय इंगळेला वाचविण्यासाठी निलेश राणेंचे प्रयत्न सुरु असल्याची कुजबुज*

*पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल जप्त न केल्यास आंदोलनाचा वैभव नाईक यांचा इशारा*

एकीकडे आमदार निलेश राणे हे हिंदुत्वाचा बाता मारत आहेत आणि दुसरीकडे त्यांचाच एक कट्टर कार्यकर्ता आणि भाजप युवामोर्चाचा कणकवली तालुका चिटणीस, भंगार व्यवसायिक विजय मराप्पा इंगळे ( रा. कलमठ) याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमधील चोरी केलेल्या घंटा चोरट्यांकडून भंगारात विकत घेतल्या आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मंदिरातील घंटा व इतर साहित्य चोरी करणाऱ्या सराईत गन्हेगारांच्या टोळीस जेरबंद केले असून या चोरटयांनी चोरी केलेल्या घंटा व इतर साहित्य विजय इंगळे याला विकल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे विजय इंगळे याचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी विजय इंगळे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.मात्र हिंदूंच्या मंदिरातील घंटा चोरी प्रकरणातील गुन्हेगार विजय इंगळेला वाचविण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्न करीत असल्याची कुजबुज सर्वत्र सुरू आहे. निलेश राणेंच्या वरदहस्तामुळे आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही अशा अविर्भावात असल्यामुळेच विजय इंगळे याने चोरीच्या घंटा विकत घेतल्या आहेत. जर भाजपचे पदाधिकारी हिंदूंच्या मंदिरातील चोरलेल्या घंटा भंगारात विकत घेत असतील तर भाजपकडून हिंदूंच्या श्रद्धेशी आणि आस्थेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी या चोरीतील मुद्देमाल जप्त केलेला नाही तसेच विजय इंगळे याचे गोडाऊन देखील सील केलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याआधीही अनेक चोरीचे प्रकार झाले आहे त्यातील मुद्देमाल देखील विजय इंगळे यालाच विकला असण्याची दाट शक्यता आहे.याचा पोलिसांनी शोध घ्यावा. कोणाच्याही दबावाला न जुमानता विजय इंगळे याच्याकडील चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!