*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला गटाकडून उपोषण*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच लोकांना घरकुल योजनेतून घरे मंजूर झाली आहेत, ती घरे पूर्वी मातीची होती व तोच सव्हें कायम करून ज्यांनी घरे पक्की व दुमजली आहेत त्यानंतर व घरात चारचाकी गाड्या मुले सरकारी नोकरीत असणाऱ्यांना घरे मंजूर कशी काय झाली ज्यांना घर नाही अशांना घर देणे आवश्यक आहे.
या साठी आज दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला गटाकडून गरजु लोकांना घेवून उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या महिला गटाच्या उपोषणाला पाठिंबा ही मिळाले आहेत.
या उपोषणास तालुका प्रमुख संजय गवस यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
तसेच झरेबाबर चे सरपंच अनिल शेटकर यांनी ही उपस्थित राहून उपोषणास पाठिबा दर्शविले आहे.