*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ*
*राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थिती*
*कणकवली- प्रतिनिधि*
आज कणकवली -वैभववाडी- देवगड येथील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी व भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अतिशय महत्वाचे असल्याने सर्व शिवसैनिकांनी जोमाने या अभियानात कामाला लागले पाहिजे व गावागावात शिवसेना शाखा मजबूत केल्या पाहिजेत अशा सूचना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केल्या.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. दौऱ्याबाबत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्वांना महत्वाच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि.प.माजी अध्यक्ष संजय पडते, संघटक रुपेश पावसकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेना जिल्हाध्यक्ष मेहुल धुमाळे, विधानसभा प्रमुख संदेश सावंत यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.