*कोंकण एक्सप्रेस*
*हिरकणीतर्फे मुख्याधिका-यांना शुभेच्छा*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील हिरकणी शहर स्तर संघाने वेंगुर्ला नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाच्या अध्यक्ष आकांक्षा परब, उपाध्यक्ष अस्मिना मकानदार, सहसचिव रसिका राऊळ, आरोग्य सल्लागार शिवानी ताम्हणेकर, गौरी माईणकर, रूक्मिणी भगत तसेच नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल व सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे आदी उपस्थित होते.