*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव हायस्कूलला अग्निशामक यंत्रांची मोलाची देणगी*
“शाळेच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल*
*शिरगाव | संतोष साळसकर*
शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेचे मुख्य खजिनदार श्री. पवनकुमार झिलू फाटक यांनी शिरगाव हायस्कूला आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी देणगी दिली आहे. त्यांनी एकूण १३,५०० रुपये किमतीची, प्रत्येकी चार किलो वजनाची अशा ८ अग्निशामक यंत्रे शाळेला प्रदान केली.
या उपक्रमामुळे शाळेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भर पडली असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातूनही ही देणगी फारच उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच शिक्षण संस्थांमध्ये आपत्कालीन तयारीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
या मोलाच्या देणगीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण कर्ले, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम,शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापक एस. एन. अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री. पवनकुमार झिलू फाटक यांचे मनःपूर्वक आभार मानले.