*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव येथे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट फिटिंग सेंटरचे उद्घाटन*
*ग्रामस्थांना आपल्या वाहनांसाठी HSRP मिळविणे झाले सोयीचे*
*शिरगाव | संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेतील शिंदे कॉम्प्लेक्स येथे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) फिटिंग सेंटरचा शुभारंभ शनिवारी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साटम व उद्योजक हेमंत देसाई यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. या सेंटरच्या शुभारंभामुळे शिरगाव तसेच परिसरातील वाहनधारकांसाठी HSRP बसवणे अधिक सुलभ झाले आहे.
हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साटम व अमित साटम यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. शासन नियमानुसार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवणे आता बंधनकारक असून, या प्लेटमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित राहणार आहे.त्यामुळे वाहन चोरी अथवा बनावट नंबर प्लेटसारख्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी तसेच अन्य वाहनांसाठी अधिकृत व प्रमाणित पद्धतीने नंबर प्लेट फिटिंगची सुविधा उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवर ही सेवा मिळाल्यामुळे वाहनधारकांचा वेळ व खर्च वाचणार असून ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे.
सदर सुविधेचा लाभ घेऊन वाहनधारकांनी आपापली HSRP लवकरात लवकर बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
या उद्घाटनप्रसंगी
मिलिंद साटम, अमित साटम, हेमंत देसाई, वसंत साटम, महेश मेस्त्री,पुंडलिक शेट्ये,केतन धुळप, अजित परब, योगेश सावंत, विठोबा घाडी, गोठ्या माळवदे, बाबू शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी
९८६०३००६९१ / ७७७६९५७०५९ / ९८२३९४७१७० / ९५७७१९९१००
वरील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.