*कोंकण एक्सप्रेस*
*प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी नवीन कुर्ली प्राथमिक शाळेला भेट दिली शाळेच्या वतीने मुख्याध्यापक जोशी मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रांताधिकारी यांचे स्वागत केले, तसेच शाळेतील सर्व वर्गांना भेट देऊन मुलांसोबत संवाद साधला. ‘आय एम विनर’ आणि ‘सिंधू टॅलेंट सर्च’ स्पर्धेतील यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेतील मुलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी, शाळेचा आजूबाजूचा स्वच्छ परिसर पाहून शाळेतील शिक्षक आणि पालकांचे कौतुक व अभिनंदन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, शिक्षण प्रेमी राजेंद्र कोलते, प्रशांत दळवी, तांबे सर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.