*कोंकण एक्सप्रेस*
*घाडीवाडा वेतोबा वर्धापनदिन १९ पासून*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला-घाडीवाडा येथील श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन आणि आर्चाशुद्धी, लघुरूद्र स्वाहाकार सोहळा १९ ते २१ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. १९ रोजी गणपती पूजन, पुण्याहवाचन, देवता संप्रोक्षण, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, रात्रौ ७ वा. ओंकार दशावतार नाट्य (शेखर शेणई) वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग, दि. २० रोजी श्रींना दुग्धभिषेक, पूजा, श्रीसत्यनारायण महापूजा, रात्रौ ७ वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग, दि. २१ रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (बाबी कलिगण) नेरूर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्त श्री देव वेतोबा व्यवस्थापक यांनी केले आहे.