*कोंकण एक्सप्रेस*
*श्री रवळनाथ आणि परिवार देवता आर्चाशुद्धी, संप्रोक्षण, कलशारोहण व महारूद्र सोहळा*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील श्री देव रवळनाथ आणि परिवार देवता आर्चाशुद्धी, संप्रोक्षण, कलशारोहण व महारूद्र सोहळा २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सपन्न होणार आहे.
दि.२७ एप्रिल रोजी सायं. ४ वा.बॅ.खर्डेकर कॉलेज, हॉस्पिटल नाका, श्री सातेरी मंदिर, राऊळवाडा, श्री देव रामेश्वर मंदिरमार्गे श्री देव रवळनाथ मंदिरापर्यंत तरंगदेवता व कलशाची सवाद्य मिरवणूक, दि. २८ रोजी सकाळी ७ पासून गणपती पूजन, पुण्याहवाचन, संकल्प, स्थलशुद्धी, देवतांना व शिखर कलशला जलाधिवास, वास्तू हवन, नैवेद्य प्रसाद, सायं. ७ वा. स्थानिक मंडळांची संगीत व वारकरी भजने, दि.२९ रोजी सकाळी ७ वा. स्थापित देवता पूजन, उर्वरित जलाधिवास स्नाने वगैरे, शय्याधिवास ग्रहयज्ञ, शिखरासहीत सर्व देवतांना पर्याय हवन, नैवेद्य प्रसाद, सायं. ७ वा. श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (वेंगुर्ला) नाटक.
दि. ३० रोजी सकाळी ६.३० वा. देवता प्राणप्रतिष्ठा, ७.४५ वा. अवसारी देवतांच्या उपस्थितीत शिखर कलश स्थापना, ८.४५ वा. महापूजा, ७.३० वा. महारूद्र प्रारभ, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक, नैवेद्य, सायं. ७ वा.ह.भ.प.महेशबुवा काणे (चिपळूण) यांचे ‘गरूड गर्वहरण‘ यावर कीर्तन, दि.१ मे रोजी सकाळी ७.३० वा. रवळनाथादी देवता महापूजा, लघुरूद्र, हवन, बलिदान, पूर्णाहूती, श्रीसत्यनारायण महापूजा, महानैवेद्य, आरती, दुपारी १ पासून महाप्रसाद, सायं.७ वा. तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. सर्व भाविकांनी यावेळी उपस्थित राहून श्रींच्या सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.