*कोंकण एक्सप्रेस*
*१०० दिवस कृती आराखडा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७ समन्वयकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘क्रीडादुत’ पुरस्काराने सन्मान*
*कासार्डे ; संजय भोसले.*
१०० दिवस कृती आराखडा या योजनेअंतर्गत नवीन संकल्पना म्हणून यावर्षी क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले प्रत्येक तालुका समन्वयकांना ‘क्रीडादूत’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार हा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रत्येक तालुका समन्वयक यांनासन्मानपत्र,
शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार यावर्षी प्रथमच देण्यात आला आहे.
*पुरस्कार प्राप्त तालुका समन्वयक पुढीलप्रमाणे*
बयाजी बुराण-कणकवली,उत्तरेश्वर लाड- देवगड,अजय शिंदे -मालवण,विजय मयेकर- कुडाळ,नंदू नाईक- सावंतवाडी, संजय परब -वेंगुर्ला, हनुमंत सावंत – दोडामार्ग, आदींचा समावेश आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सचिन रणदिवे, वरिष्ठ लिपिक सुरेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.