*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच लोकांना घरकुल योजनेतून घरे मंजूर*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच लोकांना घरकुल योजनेतून घरे मंजूर झाली आहेत, ती घरे पूर्वी मातीची होती व तोच सव्हें कायम करून ज्यांनी घरे पक्की व दुमजली आहेत त्यानंतर व घरात चारचाकी गाड्या मुले सरकारी नोकरीत असणाऱ्यांना घरे मंजूर कशी काय झाली ज्यांना घर नाही अशांना घर देणे आवश्यक आहे.
बेघर लोक पंचायत तसेच ग्रामपंचायतीने दरवाने घासत राहतात. त्या लोकांना न्याय मिळवून घरे मंजूर करावी अन्यथा दिनांक २१/०४/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पंचायत समिती समोर या गरजु लोकांना घेवून उपोषण करणार आहोत,असा इशारा दोडामार्ग उबाठा महिला गटाकडून करण्यात आला आहे
मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती दोडामार्ग यांस निवेदन सादर करतात
सौ. विनिता विष्णु घाडी,
सौ. जेनिफर लोबो,
सौ. रेश्मा शेख ,सौ. नयनी शेटकर उपस्थित होते.