*कोंकण एक्सप्रेस*
*आरोग्य शिबीर उपक्रम – एक काळाची गरज ओळखून मंगेश लोके यांनी उचलले पुढाकाराचे पाऊल*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
*आधुनिक जीवनशैली, वाढता ताणतणाव व अपुरी आरोग्यजाणीव यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबीर हे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी खांबाळे केंद्रशाळा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते
*या शिबिरात ECG तपासणी,हृदय व मेंदूच्या रक्त वाहिन्यांची कार्यक्षमता व हिमोग्लोबीन आणि ब्लड प्रेशर, डर्मास्कोपी त्वचेची तपासणी,पचनसंस्थेची कार्यक्षमता,लिवर कार्यक्षमता,ऑटोस्कोपी कानाची तपासणी, ब्लड आणि शुगर तपासणी,ऑफथाल्मोस्पी, डोळे तपासणी,चॅलन्स कोलेस्ट्रॉल,मिनरल आणि ट्रेस मिनरल,रक्तातील चरबीचे प्रमाण,जीवनसत्त्व,मोठे आतड्यांचे आरोग्य,ॲमिनो ॲसिड,थायरॉईड कार्यक्षमता, बेसिक फिजिकल क्वालिटी,पल्स ऑक्सीमीटर,मुत्रपिंड,पित्ताशय, फुफ्फुसाची तपासणी,रोग प्रतिकारक प्रणाली,स्वादूपिंड,मेंदूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी,रक्तातील हेवी मेटल, पुरूषांकरीता : प्रोस्टेट,हाडांचे विकार,डोळ्यांचे आरोग्य, स्त्रियांकरीता : हाडांचे आरोग्य,ॲलर्जी, मासिक पाळी,ह्युमन टॉक्सिन,त्वचा व त्वचेसंबंधी घटक,लठ्ठपणा,शरीररचना विश्लेषण,रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी यांसारख्या अनेक विषयांवर वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या.
*स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून,अनेकांनी यामुळे वेळेवर निदान झाल्यामुळे पुढील उपचारांसाठी दिशा मिळाल्याचे सांगितले.
*या शिबिरामुळे फक्त आरोग्यसेवा पुरवली गेली नाही, तर एक सामाजिक जाणीवही रुजवली गेली आहे – की आरोग्य ही सगळ्यांची जबाबदारी आहे!
*गावकरी,महिलावर्ग व वृद्ध यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.अनेक नागरिकांनी याआधी कधीच आरोग्य तपासणी न केल्याचे सांगितले,त्यामुळे हा उपक्रम त्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.
*या उपक्रमाने ग्रामस्थांच्या मनात आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली असून अशा शिबिरांची नियमित गरज व्यक्त होत आहे. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय आहे.
*या शिबिरामध्ये मुंबई येथून आलेले तज्ज्ञ डॉ. रघुनाथ गावडे,आनंद तावडे,रोशन चव्हाण,नीलम अनावकर यांच्या टीमने लोकांना आवश्यक सल्ला सल्ला दिला व शेकडो नागरिकांची मोफत तपासणी केली.
*शिबिराच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
*यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे,सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, उपसरपंच मंगेश गुरव, माजी सरपंच गौरी पवार,विठोबा सुतार, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण,रसिका पवार,माजी चेअरमन दीपक चव्हाण,माजी उपसरपंच लहू साळुंखे,ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक पवार ,शांताराम कदम ,महादेव पवार सुरेश पवार,शांताराम पवार, बळीराम सावंत आदी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी माजी विभागप्रमुख सुनिल पवार, प्रमोद लोके,दीपक वसंत पवार, मिलिंद पवार,गणेश सदाशिव पवार,परेश साईल,मंगेश कांबळे,सुनिल गुरव,अमित कर्पे, सचिन पवार, मेघनेष पवार,रोहित पवार, दत्ताराम पालकर, संदेश निग्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.