*कोंकण एक्सप्रेस*
*रिलायन्स रिटेलतर्फे युस्टा आता गोव्यातही*
*म्हापश्यात नव्या स्टोरची सुरुवात*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
म्हापसा रिलायन्स रिटेलचा युस्टा हा तरुणांसाठीचा फॅशन ब्रँड पश्चिम भारतात सातत्याने आपला व्यवसाय वृद्धिंगत करत आहे. आता या ब्रँडतर्फे गोव्यात म्हापसा धुळेर येथे नव्या स्टोअरची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, उत्तराखंड आणि आता गोव्यात स्टोअर सुरू करून हा ब्रँड देशभरात वेगाने आपले अस्तित्व बळकट करत आहे. ट्रेंडी टॉप ते बॉटम कपडे, युनिसेक्स आणि कॅरेक्टरवर आधारित वस्तू आणि ‘स्टारिंग नाऊ’ अशा खास कलेक्शनअंतर्गत आठवड्याची नवी फॅशन अशा बहूविध श्रेणीतून तरुण ग्राहकांना आकर्षित करून घेण्यास युस्टा बांधिल आहे. येथील कलेक्शनमधील वस्तू अगदी १७९ रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे, तरुण ग्राहकांना प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत.
म्हापसा येथील स्टोअरमध्ये इतर सर्व स्टोअर्सप्रमाणेच आधुनिक, तंत्रज्ञानाधारित खरेदी करता यावी यासाठी सहजसोप्या सोयी देणारे सेल्फ चेकआऊट काऊंटर्स, ग्राहकांच्या सोयीसाठी चार्जिंगची व्यवस्था यातून समकालीन अनुभव दिला जातो. तसेच कस्टमर इन्फ्लुएन्सर उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना त्यांची अनोखी आणि आवडती स्टाइल युस्टासह शेअर करता येईल.

