*कोंकण एक्सप्रेस*
*व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको अशी आजची सामाजिक स्थिती*
*देवगड येथील संविधानिक विचार मंच आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड येथील संविधानिक विचार मंच आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकम प्रसंगी बोलताना व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको अशी आजची सामाजिक स्थिती असल्याचे असे प्रतिपादन मुख्याध्यापक रयत पब्लिक स्कुल, कुंभोजचे व्याख्याते प्रा.सागर माने यांनी केले. आजची आणि कालची सामाजिक परिस्थिती पहाता जरी शिवा शिव अशा प्रकारची जातीयता नसली तरी खाजगीकर आणि आरक्षणाच्या नावावर भयाणक छडयंत्र सुरू आहे. संविधान बदलण्या पेक्षा खिळखिळे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कायक्रमाचे आयोजन संविधानिक विचार मंच देवगडच्या वतीने देवगड कॉलेज नाका परिसरात करण्यात आले होते.या कार्यक्रम प्रसंगी विचारमंचावर पंचायत समिती देवगडचे अधिक्षक संतोष बिर्जे, अध्यक्ष के.एस कदम आंबेडकर चळवळीचे नेते विनायक मिठबांवकर, डॉ.प्रा.निलेश वानखडे, कास्टट्राईब संघटनेचे राज्यध्यक्ष आकाश तांबे, वैभव बिडये, विचार मंचाच्या महिला अध्यक्षा सुरभी पुरळकर, सुनिल गस्ती, श्रीपत टेंबुलकर, मोहन जामसंडेकर, संजय कदम, प्राचार्य भालचंद्र मुंबरकर,सरचिटणीस इंजिनियर दिलीप कदम, प्रा.संजय धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी बोतलान सागर माने यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश झोत टाकला. छ.शिवाजी महाराज, महात्माफुले , सावित्रीबाई फुले, छ.शाहूमहाराज यांच्या देखील कार्याला उजाळा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देश स्वतंत्र झाल्यावर कायदा मंत्री असताना महिलांसाठी कायदयाच्या स्वरूपात अनेक चांगल्या आणि महिलांच्या प्रगती संरक्षणाचे कायदे केले.आजची महिला सक्षम आहे याचे सर्व श्रेय बाबासाहेब यांच्या संविधानिक विचाराला आहे असे ही यावेळी त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब यांचा जिवन पट मांडताना अनेक मुद्दयांव्दारे कालची आणि आजची बदललेली सामाजिक स्थिती यावर परखड विचार मंथन केले. सरपंच देशमुख खत्याकांड ते नाव न घेता माजी मंत्री विवाह प्रकरण यावरही भाष्य केले. आरक्षण या विषयी बोलताना आरक्षण हे सामाजिकदृष्टया मागासलेल्या सामाजिक उथानासाठी तरतूद होती. आरक्षणाची तरतुद हा काही गरीबी हटावाचा नारा नव्हता. आरक्षणामुळे बौध्दांचा विकास झाला नाही तर बाबासाहेब यांनी दिलेला मंत्र गावखेडे सोडा आणि शहराकडे चला, तसेच शिका संघटीत व्हा या मंत्राचे अनुकरन केल्यामुळे झाला असेही स्पष्ट सांगीतले.
आजच्या बदलत्या भयानक सामाजिक परिस्थित या देशातील महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचारच देशाला प्रगती पथावर नेऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण मानव समाजाने आता सजग होवून बदलल्या परिस्थिला सामोरे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सागितले.तसेच महामानवाची जयंती नाचून नाही वाचून केली पाहिजे असे ही स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून टेंबवली येथील फुल विक्रेते अरविंद जाधव आणि उभयतांचा मुलगा अमित यांनी एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून महसूल विभागात निवड झाल्याबद्दल सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संतोष बिर्जे, विनायक मिठबांवकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तसेच शेठ म.ग.हायस्कूल चा इ.६ वीचा आदर्श विदयार्थी प्रज्योत व डॉ.होमी भाभा विज्ञान परीक्षा२०२४-२५ बाल वैज्ञानिक कास्य पदक विजेता ठरल्याने प्रा.सिध्दी कदम, दिलीप कदम उभयतांसह सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. के.एस.कदम यांनी अध्यक्षीय भाषण केले तर दिलीप कदम यांनी प्रास्ताविक केले .या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुर्यकांत साळूंखे तर आभार प्रदर्शन डॉ.प्रा.वानखडे यांनी केले.