*एकत्रित वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*एकत्रित वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कोंकण एक्सप्रेस*

*एकत्रित वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

हिदू धर्मातील मुलींची असणारी कमी संख्या, शिक्षण आणि इतर अपेक्षा यामुळे सर्वांची स्वजातीतच लग्न होणे खुप कठीण झाले आहे. त्यासाठी अखिल कोकण विकास महासंघातर्फे हिदू धर्मातील सर्व जातींचा एकत्र वधू-वर मेळावा कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे १३ एप्रिल रोजी पार पडला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यापूर्वी हा उपक्रम मुंबई आणि डोंबिवली येथे घेण्यात आला होता.

अखिल कोकण विकास महासंघाची स्थापना स्थापना अध्यक्ष तानाजी परब व सल्लागार दिपक देसाई व अनेक सहका-यांच्या सहकार्याने १६ वर्षांपूर्वी करण्यात आली. एसटी, कोकण रेल्वे, कोकणातील शेती बागायती, फळप्रक्रिया, विक्री व्यवस्था, शिक्षण, दशावतार मंडळ, भजन मंडळ, सामाजिक संघटना एकत्र करून अनेक समस्या सातत्याने सोडवण्याचे काम ही संघटना करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रमण प्रभूखानोलकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केल्यावर सावंतवाडी टर्मिनल, त्याला प्रा.मधू दंडवते यांचे नाव देणं, अनेक रेल्वेंना जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्टेशनवर थांबे देण्यासाठी खासदार नारायणराणे, केंद्रीय रेल्वे मंत्री तसेच रेल्वे अधिकारी यांची भेट घेण्यात आली आहे. तसेच कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेने मोलाची साथ दिलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी-बागायतदार यांना वानरांचा असह्य त्रास होत आहे. त्यासाठी ही संघटना शासनाकडे सातत्याने वानरांचा बंदोबस्त करून शेतकरी बागायतदार यांची या त्रासातून मुक्तता करावी यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. संपूर्ण कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण व पक्ष विरहित संघटना म्हणून ही संघटना कार्यरत आहे त्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभागी द्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष तानाजी परब व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रमण प्रभूखानोलकर यांनी केले आहे.

दरम्यान, कुडाळ येथे झालेल्या वधूवर मेळाव्यात नोंदणी झालेल्या सर्व जातीच्या उच्च तसेच मध्यम शिक्षित वधुवर तसेच त्यांच्या पालकांना व्यासपिठावर निमंत्रित करून त्यांना आपली माहिती आणि अपेक्षा सांगायला लावल्या. यावेळी तानाजी परब, कार्याध्यक्ष मनीष दाभोलकर, सचिव डॉ. अमित दुखंडे, रमण प्रभूखानोलकर, खजिनदार डॉ.सुनिल अष्टीकर, सहसचिव भास्कर मडव, सागर मुळे, उपाध्यक्ष प्रविण घोलम, डॉ.स्वप्निल परब, सल्लागार सुधीर वेंगुर्लेकर, डोंबिवली शहर अध्यक्ष सुजाता परब, सचिव सुहास पांगे, सहसचिव उमेश परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!